मुंबई | भाजपची चौथी यादी आज (४ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या चौथ्या यादीत ७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे रोहिणी खडसे ही मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर घाटकोपर पूर्वमधू माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट झाला असून यांच्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Bharatiya Janata Party has released fourth list of 7 candidates for #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/qDtsqwJkta
— ANI (@ANI) October 4, 2019
भाजपने पहिल्या यादीत १२५ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत १४ उमेदवारांचा समावेश होता. तर तिसऱ्या यादीत ४ उमेदवार घोषित केले आहेत. तसेच भाजपने चौथ्या यादीत ७ उमेदवारांची घोषणा घेतली आहे. या चारही याद्या मिळून भाजपने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी १५० उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.