HW News Marathi
महाराष्ट्र

… देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?, भास्कर जाधव आक्रमक

मुंबई | भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून ‘म्यॅव म्यॅव’ची घोषणा दिल्यानंतर या घटनेचे आता सभागृहातही पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी होत आहे. तर यापूर्वीही राणे यांनी पावसाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात एक विधान केलं होतं. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तुमच्या काळात हरिभाऊ बागडेंनी अनेक आमदारांना निलंबित केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?, असा सवाल भास्कर जाधवांनी यावेळी उपस्थित केला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि हरिभाऊ बागडे यांना प्रश्न विचारायचा आहे. जर मला दोन बिस्किट घालून चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याचेवळी नितेश राणेंना चंद्रकांत पाटील यांनी विचारायला पाहिजे होतं की, जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते, तेव्हा तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला किती बिस्किटं खायला घातली होती, हे चंद्रकांत पाटलांनी नितेशला विचारायला हवे होतं, असा हल्ला भास्कर जाधव यांनी चढवला.

अंगविक्षेप केल्यानंतर जाधवांनी मागितली माफी

पुढे जाधव म्हणाले, तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला सांगितले. त्यानंतर मी माफी देखील मागितली. तर मग विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू अस त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते. मात्र तरी नितेश राणे हे जुमानले नाहीत. ते माध्यमांसमोर त्यांनी केलेल्या कृत्याच्या समर्थनार्थ बोलतच होते, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

राणेंना निलंबित करण्याची सभागृहात मागणी

ज्यावेळी मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर होतो, तेव्हा १२ आमदार निलंबित झाले. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी दोन बिस्कीट देतो, जा त्याला चावून ये, हा चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव असं वक्तव्य सदस्य नितेश राणे यांनी केलं होतं. माझ्याकडे याची क्लिप आहे. दोन बिस्किट घालून मला चावायला सांगितलं, तर मग तुमच्या काळात हरिभाऊ बागडेंनी अनेक आमदारांना निलंबित केलं होतं, तेव्हा फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला आहे. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि नितेश राणेंना निलंबित करा, अशी घोषणाबाजी सुरु झाली. तर यावरून विरोधकही चांगलेच आक्रमक झालेले.

Related posts

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी, गुणरत्न सदावर्तेंसह 115 ST कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

Aprna

ड्रग्स प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

News Desk

हेमंत नगराळे यांची  महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी

News Desk