HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसेनेला टार्गेट केलं जातंय”, भावना गवळींचा आरोप

वाशीम | महाविकास आघाडीवर ईडीचं सावट आहे असं म्हटलं जातंय. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना काल(२९ ऑगस्ट) ईडीकडून नोटीस आली असून आज(३० ऑगस्ट) पुन्हा शिवनेला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना देखील आता ईडीने नोटीस पाठवली आहे. मात्र भावना गवळी यांनी आता भाजपवर उलट आरोप केला आहे. ‘ शिवसेनेनला टार्गेट केलं जातंय’, अश्या शब्दात त्यांनी भाजपवर आरोप केला आहे.

ईडीची नोटीस आलीच नसल्याचा

भावना गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. केंद्र सरकाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला आहे.

निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार

भावना गवळी यांनी भाजपवर आरोप केले आहेत. मला कोणतीही नोटीस आलेली नाही. मला नोटीस मिळालेले नाही. त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे. एक महिला सातत्याने निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. भावना गवळी सातत्याने पाच वेळा निवडून येते आणि ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण देण्याचं काम करते. मी कुणाची जमीन घेतली नाही. सरकारचा पैसा वापरला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ते भूमाफिया आहेत

“भाजपाचे एक आमदार या भागातील आहेत. ते भूमाफिया आहेत. त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे. माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही लावा ही विनंती आहे. केवळ शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. आणीबाणी लावल्यासारखं दिसत आहे.राजकारणाची पातळी घसरत आहे. “,असा आरोपही त्यांनी केला आहे.

कोण आहेत भावना गवळी?

भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता. यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवाला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. पुंडलिक गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य! – उदय सामंत

Aprna

सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्वही समजावून सांगणार! – आदित्य ठाकरे

Aprna

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे १०४ व्या वर्षी झाले निधन

News Desk