मुंबई | भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणी आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलविण्यात येणार आहे. येत्या एप्रिल महिन्यातील ४ तारखेला पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे. “भीमा कोरेगावा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे, यांची चौकशी करावी,” अशी मागणी शरद पवार यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.
Bhima Koregaon Commission has summoned Nationalist Congress Party Chief Sharad Pawar to appear before the Commission on 4th April.
The Commission is inquiring into the reasons which led to the 2018 Bhima Koregaon violence in Maharashtra. (File pic) pic.twitter.com/tLJqmHjUBs
— ANI (@ANI) March 18, 2020
तसेच, भीमा-कोरेगाव हिंसचारासंदर्भात न्याय होण्याच्या दृष्टीने आयोगाने पवार यांना समन्स बजवावा आणि त्यांनी संबंधित माहिती आयोगाकडे जमा करावी, अशी मागणी एका अर्जाद्वारे त्यांनी भीमा-कोरेगाव आयोगाकडे सादर केला होता. यानुसार पवारांना येत्या ४ एप्रिल आयोगाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.