HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या वक्तव्यांवर भुजबळांचा मिश्किल टोला!

मुंबई। नारायण राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा राणेंचं विधान चर्चेत आलंय भारतीय जनता पक्ष मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन करील, असं विधान करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्याबरोबरच राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राणेंच्या या वक्तव्यांवर मिश्किल टोला लगावला आहे.

विरोधकांच्या सद्बुद्धीला जे पटतं तेच ते बोलतात

लवकरच भाजपचे सरकार महाराष्ट्रात येईल. हा बदल तुम्हाला दिसेल, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला प्रत्युत्तर देण्यात येतं. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून विरोधी पक्ष नेते हेच म्हणत आहेत. पण सरकार व्यवस्थित चाललं आहे. विरोधकांच्या सद्बुद्धीला जे पटतं तेच ते बोलतात, असा टोला त्यांनी लगावला होता. तर आता छगन भुजबळ यांनीही विरोधकांवर टीका केली आहे.

नवाब मलिक राणेंना काय म्हणाले?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केले होते. याला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या आणि बोकड जमले, की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागते, असा खरमरीत टोला नवाब मलिक यांनी राणेंना लगावला. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी राज्यातील सरकार पडणार नाही. महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेकायदा काम करणारी लोकं सुटतात मात्र कुटुंबे दुर्घटनेच्या कचाट्यात सापडतात!

News Desk

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk

नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास शिवसेनेचा अडथळा

News Desk