मुंबई। कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. तसेच, नव्या कोरोनाबाधितांची संख्या देखील घटू लागल्याचं गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. काही राज्यांकडून लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.
It is important for the vaccine industry to be self-reliant for its raw materials #AtmanirbharBharat. With this in mind, @SerumInstIndia has acquired 50% stake in SCHOTT Kaisha to ensure uninterrupted supply of essential pharma packaging products for the Indian vaccine industry. pic.twitter.com/Lx81l70RT9
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 17, 2021
सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली असून दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेलं पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलं आहे. “देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे”, असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ही फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातली भारतामधील महत्त्वाची कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिरम इस्टिट्युट शॉट कायशाकडून औषधांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.