HW News Marathi
महाराष्ट्र

‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात 

पुणे | ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी अभिजीत बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता बिचुकले यांच्या नावची पुन्हा चर्चा रंगली आहे.

अभिजित बिचुकले म्हणतात, माझे चाहते मला नेहमी पाठिंबा देतात. मात्र, पैसा आणि सत्तेच्या ताकदीपुढे माझी चिकाटी कमी पडतेय. परंतु, आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी माझा गांभीर्याने विचार करावा.मतदारांनी मला एकदा संधी देऊन बघावी. या आधी अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आव्हान दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर मग आम्ही उद्धव ठाकरेंना उठा आणि शरद पवारांना काय शपा म्हणायचं? चंद्रकांत पाटील

News Desk

कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार! – आदित्य ठाकरे

Aprna

‘फसवी कर्जमाफी’ शेतकऱ्याने लावला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा फ्लेक्स…

News Desk