HW News Marathi
महाराष्ट्र

कलर्स वाहिनीकडून माफीनामा सादर, मराठी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याने दिलगिरी केली व्यक्त!

मुंबई | हिंदी कलर्स वाहिनीवर बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. मात्र, बिग बॉस हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर अन्य पक्षाच्या नेत्यांनी जान कुमार सानू आणि कलर्स वाहिनीला इशारा दिला. परंतु वाढता विरोध पाहता कलर्स वाहिनीकडून एक माफीनामा सादर करण्यात आला आहे.

कलर्स वाहिनीनं झालेल्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. “कलर्स वाहिनीवर २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या भागासंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. आम्ही याची दखल घेतली असून ज्या ठिकाणी ते वक्तव्य आहे तो भाग आम्ही सर्व ठिकाणांहून काढून टाकत आहोत. मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखावली गेली याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आमच्या प्रेक्षकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि आमच्यासाठी सर्व भाषा एकसमान आहेत,” असं कलर्स वाहिनीनं पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एमपीएससी’ रिक्त पदे भरण्याचा मार्ग झाला मोकळा – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

News Desk

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit