HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही

मुंबई | मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली होती. आज सकाळी या ठिकाणच्या काही दुकांनांना आग लागली. दिवाळीच्या तोंडावर गर्दीच्या ठिकाणी ही लागली. आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यानंतर आता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

क्रॉफर्ड मार्केटमधील अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग एल-टू लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलं आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथील ३१,३२ अब्दुल रेहमान स्ट्रीट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज पहाटे आग लागली होती. या आगीत मेडिसान, स्टॉकची चार दुकांनं जळून खाक झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. तसेच, या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरिअल आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग पसरल्याचं सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” सरकारला आमदाराचा घरचा आहेर

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Aprna

मराठीतील दिग्गज कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश 

News Desk