HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही तर पदवीधर निवडणुकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही – आनंद दवे

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठे वक्तव्य केले आहे. खडसे यांनी असे म्हटले की, मी एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री पद दान केले. खडसे यांच्या या वक्तव्यानंतर ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एच. डब्ल्यु मराठीशी बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी असे सांगितले की एकनाथ खडसे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे नाहीतर पदवीधर निवडणुकीमध्ये ब्राम्हण समाज मतदान करणार नाही.

पुढे दवे असेही काल (८ नोव्हेंबर) एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत झाली त्यावेळी ते असे म्हणाले की माझा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. जर असं होतं तर त्यांनी फडणवीसांना दान केलं असे म्हणायला हवे होते. त्यात त्यांनी ब्राह्मणांचा उल्लेख करायला नको होता. जर राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही आणि त्यांनी त्यांनी शब्द मागे घेतले नाही तर पदवीधर निवडणूकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

एका जाहीर कार्यक्रमात दोघांमधील वादाचं कथन करताना ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,” असं विधान खडसे यांनी केलं आहे. मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.“नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेळगावमध्ये मतदानाला सुरुवात, शुभम शेळके की मंगला अंगडी कोण बाजी मारणार?

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”; अतुल भातखळकरांची टीका!

News Desk

जाणून घ्या…कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे

Aprna