मुंबई | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाल्याची बातमी आहे. कारण, आता काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्याला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज (१९ ऑक्टोबर) आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियुक्त्यांवर सचिन सावंत नाराज असल्याचं वृत्त असून याचमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर येत आहे.
नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आणि नियुक्त्यांच्या निर्णयावर नाराज होऊन सचिन सावंत यांनी हा निर्णय घेतला असल्याचं वृत्त आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरच्या बायोमधूनही आपलं पद हटविल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सचिन सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant resigns from his spokesperson post. He submitted spokesperson post resignation to Maharashtra Congress president Nana Patole. @sachin_inc @NANA_PATOLE@NewIndianXpress @Sunday_Standard
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) October 19, 2021
खरंतर, सचिन सावंत हे महाराष्ट्र काँग्रेसचे एकनिष्ठ नेते मानले जातात. प्रवक्ते म्हणून पक्षासाठी सचिन सावंत यांनी नेहमीच प्रभावी भूमिका वठवली आहे. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
Maharashtra Congress appoints Atul Londe Patil as chief spokesperson of Maharashtra Congress.
@atullondhe@NANA_PATOLE @NewIndianXpress @Sunday_Standard pic.twitter.com/IT480EkmIF— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) October 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.