HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

वैद्यकीय क्षेत्रातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  

मुंबई | यंदाच्या शैक्षणिक वर्षीपासूनच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशांसाठी एसईबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण लागू होणार असल्याचे गुरुवारी (११ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

‘यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करता पुढच्या म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून मराठा आरक्षण लागू करण्यात यावे’, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ‘प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झालेली असली तरीही आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते’ असे म्हणत याचिकाकर्त्यांच्या दावा अवैध ठरवत मुंबई उच्च न्यायालयाकडून ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…नंदुरबार मतदारसंघाबाबत

News Desk

महाराष्ट्रातील पोलिसांचा राष्ट्रपती पदक, शौर्य पदकांनी सम्मान

अपर्णा गोतपागर

ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलूच नये !

News Desk