HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

देवेंद्र फडणवीसांना पक्षाकडून मोठी जबाबदारी ! केंद्रीय नेतृत्त्व लवकरच करणार घोषणा

मुंबई | भाजपकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुका आता जवळ आल्यापासून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षाकडून देवेंद्र फडणवीसां यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. बिहारचे भाजप विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत फडणवीस काम करतील. दरम्यान, लवकरच केंद्रीय नेतृत्त्वाकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सी. पी ठाकूर यांनी देखील देवेंद्र फडणवीसांचे मोठे कौतुक केले आहे. “देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत. निवडणुकीत ते चांगल्यारितीने काम करतात”, अशा शब्दांत सी.पी.ठाकूर यांनी फडणवीसांची स्तुती केली आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्याचप्रमाणे, लवकरच अधिकृतरीत्या भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत मिळून भाजप ही निवडणूक लढवणार आहे. मात्र, यात अधिकाधिक जागा मिळवण्याचा भाजपाचे ध्येय आहे. देशात गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांचे बिहार निवडणुकांकडे अधिक लक्ष आहे. त्यातच सध्या बिहारमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणाशी तीव्र जनभावना जोडल्या गेल्या आहेत तर दुसरीकडे बिहारच्या राजकारणातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

Related posts

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे

News Desk

उर्मिला अभिनय नव्हे तर सॉफ्टपॉर्नसाठी ओळखली जाते ! कंगनाच्या टिकेनंतर बॉलिवूड संतप्त

News Desk

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

rasika shinde