HW News Marathi
महाराष्ट्र

ATS चा मोठा खुलासा मुंबईत राहणारा जान मोहम्मद 20 वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात!

मुंबई। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेत अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याच्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

एक जण मुंबईत राहणारा

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत जान महोम्मद याच्या बाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असून त्याचे नाव जान मोहम्मद शेख आहे. मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे.

राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मद शेख याला अटक केली

9 सप्टेंबरला दिल्लीला जाण्याची योजना जान मोहम्मद याने ठरवली आणि त्यासाठी 13 तारखेचं त्याला ट्रेनचं तिकीट मिळालं. ट्रेनने मुंबईहून दिल्लीला जात असताना राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मद शेख याला अटक केली. अटक केली त्यावेळी जान महोम्मद याच्याकडे शस्त्रसाठा सापडला नाही असंही एटीएस प्रमुखांनी सांगितलं.जान मोहम्मद शेख याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची टीम आज संध्याकाळी मुंबईतून दिल्लीसाठी रवाना होणार आहे. जान मोहम्मद याच्या संदर्भातील आमच्याकडे असलेली माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात येईल आणि दिल्ली पोलिसांकडे असलेली माहिती आमम्ही घेऊ असंही एटीएसने सांगितलं.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी कारवाईसाठी एटीएसला पूर्ण मोकळीक दिली

जानच्या हालचालींवर अनेक दिवसांपासून एटीएसचं लक्ष होतं. जान मोहम्मद गेल्या अेक दिवसांपासून आमच्या रडारवर होता. पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये जान विरोधात 20 वर्षांपूर्वीची केस आहे. या प्रकरणात एटीएसचं अपयश नाहीये. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी कारवाईसाठी एटीएसला पूर्ण मोकळीक दिली आहे.जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.

दिल्ली पोलिसांनी कारवाई केली त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती. कारवाई झाल्यावर आम्हाला याबाबत माहिती मिळाली. आता दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस आम्ही दोन्ही एकत्र मिळून कारवाई करणार आहोत असंही एटीएसने सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षक धक्काबुक्की

Aprna

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

News Desk

स्वच्छता सुविधा, पंचायतींना अनुदानासाठी सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी! – हसन मुश्रीफ

News Desk