HW News Marathi
महाराष्ट्र

आता जळगावमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे. गुलाबराव देवकर, मनीष जैन, अमरीश पटेल, के.सी.पडवी, कुणाल पाटील हे सोमवारी म्हणजेच येत्या ८ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नवी मुंबईचे संदीप नाईक, माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ, वैभव पिचड, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यातच आता पुन्हा आघाडीला जळगावमध्ये देखील जोरदार धक्का बसणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार!

News Desk

“जे जे चुकेल त्याला शासन आहे”, अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर भाजपची प्रतिक्रिया  

News Desk

राष्ट्रवादीने व्यक्त केली ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता

News Desk