HW News Marathi
देश / विदेश

BiharElection 2020 : शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्रीही रिंगणात उतरणार

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील नावे आहेत. समावेश आहे. नुकतंच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे.

शिवसेना यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे कोरोना काळात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी निवडणूक पाहण्यासारखी असणार आहे.शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण २० नेत्यांची नावे आहेत. ३ टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे

सुभाष देसाई

संजय राऊत

चंद्रकांत खैरे

अनिल देसाई

विनायक राऊत

अरविंद सावंत

गुलाबराव पाटील

राजकुमार बाफन

प्रियांका चतुर्वेदी

राहुल शेवाळे

कृपाल तुमाने

सुनिल चिटणीस

योगराज शर्मा

कौशलेंद्र शर्मा

विनय शुक्ला

काल (७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे खासदार सुप्रिया सुळे तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ३९ नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानातील हिंदुंच्या विवाहातील अडचणी दूर होणार

News Desk

“मोदीसाहेब, पश्चिम बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल – डिझेलवर का काढताय?”,रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk

कृषी कायद्यावरुन आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर, लवकर निर्णय द्या नाहीतर…

News Desk