HW News Marathi
महाराष्ट्र

बिहार निवडणूक देशातील पहिली डिजिटल निवडणूक असणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई | बिहारची विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे.ही देशातील पहिली डिजिटल निवडणूक असणार आहे. या माध्यमातून गेल्या १५ वर्षात बिहारने साधलेली प्रगती मतदारांपर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज (२३ ऑगस्ट) बिहारच्या भाजप प्रदेश कार्यकारणीशी संवाद साधला. त्यावेळी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन फडणवीस यांनी प्रदेश कार्यकारणीला केले आहे. सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे. बिहारमध्ये सर्वात जास्त युवा वर्ग असल्याचे समोर आले आहे. तेव्हा जास्तीत जास्त युवा वर्गापर्यंत पोहचण्याच्या सूचना फडणवीस यांनी राज्य कार्यकरणीला केल्या आहेत.

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर आशीष शेलार यांच्यासह काही नेत्यांना बिहारमध्ये पाठविले जाण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरुन महाविकासआघाडी सरकार आणि बिहार सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सुशांत राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत बिहार सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे CBI देण्याची मागणी केली होती. त्यामुळे निवडणुकीत सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा कोणते वळण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावल्यामुळे गुन्हा दाखल

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

News Desk

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडणार हे केवळ स्वप्नरंजन

News Desk