HW News Marathi
Covid-19

मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार !, राज्य सरकारविरोधात भाजप आक्रमक  

मुंबई | भाजपने येत्या सोमवारी आणि मंगळवारी (१२ आणि १३ ऑक्टोबर) राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना आणि धार्मिक स्थळे-मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या मुद्द्यावरून भाजप राज्य सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

“मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”, असे म्हणत केशव उपाध्येंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, केशव उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भाजप महिला आघाडीच्यावतीने राज्यातील महिला अत्याचाराविरोधात १२ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. तर १३ ऑक्टोबर रोजी राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आहे.

शिर्डी येथे भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंदिर उघडण्याच्या परवानगीसाठी आंदोलन होणार आहे. तर भाजप नेत्या चित्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असूनही मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून त्यांची गंभीरपणे दखल घेत जात नाही. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या चाचणीला तात्पुरती स्थगिती

News Desk

दिलासादायक ! राज्यात आज तब्बल २६ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

News Desk