HW News Marathi
देश / विदेश

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक ! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

मुंबई। OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२६जून) राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही आज आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा आणि राजकीय व इतर क्षेत्रातील आरक्षण पूर्ववत करा, नाहीतर सत्ता सोडा अशा मागण्यांसह भारतीय जनता पार्टीच आज संपूर्ण राज्यात ठाकरे सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू झालय. हे आंदोलन राज्यभरात मुंबई ठाणे पुणे बीड नागपूर चंद्रपूर औरंगाबाद नाशिक आणि जळगाव अशा विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ओबीसी नेते रस्त्यावर उतरले. मुंबईत आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड टोलनाक्याजवळ भाजपाच हे चक्काजाम आंदोलन सूरु आहे.

या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच राज्यभरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आशिष शेलार यांनी मुलुंड टोलनाक्याजवळ रस्त्यावर ठिय्या देत ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात देखील केली. इकडे पुण्याचा विचार केला तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हे आंदोलन केले जाते तर परळीत प्रीतम मुंडे आंदोलनाचं नेतृत्व करतात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाने जेलभरो आंदोलन आज केल आहे. यात एक लाख लोकांचं जेलभरो आंदोलनाचा पवित्रा घेतला.

ठाकरे सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण रद्द झाला आहे त्यामुळे आज भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी चालेल पण या नाकर्त्या सरकारला जाग यायला हवी. जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आमची भूमिका अशीच दिवसेंदिवस तीव्र होईल अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजेटमुळे नाराजी, सेन्सेक्स घसरला

News Desk

आयसीएसई बोर्डाकडून दहावी-बारावीचा निकाल आज होणार जाहीर

News Desk

खुशखबर ! सोन्याच्या किंमतींमध्ये घट

News Desk