HW News Marathi
महाराष्ट्र

कुडाळ नगरपंचायतीच्या तोंडावर राष्ट्रवादीला भाजपचा धक्का,नेते-पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

सिंधुदुर्ग | कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकत्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. भाजप खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरु असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र खिंडार पडल्याचं चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते, कार्यकर्ते यांचे पक्षांतर सुरुच आहे.कणकवलीत नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यावर पक्षप्रवेश सोहळा झाला.

यावेळी आमदार नितेश राणे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

तर, कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात त्यांचे पती ठेकेदारी चालवत होते. हे आपल्या कानावर आल्यानंतर आपण सभापतींना असले धंदे शिवसेनेत चालणार नाहीत, राजीनामा द्या, असे सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा वैभव नाईक यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता भरत जाधवची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ विनंती

News Desk

नगरच्या एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय!; विखे पाटलांचा इशारा

News Desk

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन

News Desk