HW News Marathi
महाराष्ट्र

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, अजित पवारांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न

नागपूर | वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र याच मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीहून नागपुरात येत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न नागपुरातील वाडी परिसरात केला. गाडी अडवल्यानंतर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना वीज बिलासंदर्भात निवेदन देण्याचाही प्रयत्न केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावतीहून बैठक आटोपून नागपूरला परत येत होते. यावेळी, अजित पवार यांचा ताफा वाडी परिसरात असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील वाडी येथे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, यावेळी पवार यांचा ताफा आडवून त्यांना वाढीव वीजबिलासंदर्भात निवेदन देण्याचा प्रयत्नही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर वाडी परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर महाविकासआघाडी सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांसाठी घरे; विशेष योजना तयार करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकसह सहा कर्मचा-यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

News Desk

Jayant Patil HW Exclusive : भाजपच्या नेते मंडळींना ‘कोरोना’पेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते !

News Desk