HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही पोपट-बीपट पाळत नाही…ते काम शिवसेनेचंच !, चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अलिबाग पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यासह केंद्रातील देखील भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि ठाकरे सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. “अर्णब आमचा कार्यकर्ता नाही. आम्ही पोपट-बीपट पाळत नाही. ते काम शिवसेनाच करते”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अनिल परब म्हणाले होते की, “गोस्वामी भाजपचा सदस्य आहे का? त्याच्यासाठी गळा काढण्याचे कारण काय? महाराष्ट्रात मराठी महिलेवर अन्याय झाला तर तिच्याकडे पाहायचं नाही का ? भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकला. म्हणूनच भाजपचा जीव त्याच्यात अडकला आहे का?” दरम्यान, अनिल परब यांच्या याच टिकेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. “आम्ही लोक खंबीर आहोत. दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत नाही”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अनिल परब नेमकं काय म्हणाले होते ?

अनिल परब म्हणाले की, “अर्णब गोस्वामी भाजपचा सदस्य आहे का? त्याच्यासाठी गळा काढण्याचे कारण काय? भाजप खुन्याला वाचवत दुहेरी भूमिका घेत आहे. सोनिया गांधी यांनी सुसाईड नोट लिहायला दिली होती का? भाजपला राजकीय त्रास का होतोय? या प्रकरणी जे पोलीस दोषी असतील त्यांचीही चौकशी करून कारवाई करू. कोणाचीही गय केली जाणार नाही. भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकला, भाजपचा जीव त्याच्यात अडकला आहे का? फिरोज शेख, नितीश सारडा यांच्या अटकेबाबत भाजप का बोलत नाही?”

चंद्रकांत पाटलांनी काय म्हटलं ?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “अर्णब काही आमचा कार्यकर्ता नाही. आम्ही पोपट पाळत नाही, ते काम तुम्हीच करता. आम्ही खंबीर आहोत, दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत नाही. ही ठोकशाही आहे. अर्णबची सुटका होईपर्यंत आम्ही काळे पट्टे, जे जे काळे परिधान करू शकू ते करणार आहोत. आणीबाणीनंतर पराभव झेलावा लागला होता. उद्धव आणि सोनिया गांधींनी भ्रमात राहू नये.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारला अद्यापही सूर गवसलेला नाही, फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

swarit

आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा केला व्हाईट, किरीट सोमय्यांचा नाशिकमध्ये आरोप!

News Desk

ठरलं ! MPSC परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

News Desk