HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपने ऐनवेळी ‘या’ उमेदवाराला दिली संधी

मुंबई | येत्या २१ मेला विधान परिषजेची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावे दिली होती. मात्र, भाजपने ऐनवेळी डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी ८ मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा (११ मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी अर्ज दाखल केला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल आहे. तर कॉंग्रेसकडून राजेश राठोड यांनी अर्ज दाखल केला.

तर ऐनवेळी भाजपकडून डॉ अजित गोपछेडे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावत रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केले आहे.

कोण आहेत रमेश कराड?

  • रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते.
  • सध्या ते पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
  • 2018 मध्ये त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेचं तिकीट दिले होते.
  • मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाटलांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो, पण फटका लगावतो !

News Desk

६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवच, पडळकरांचा टोला

News Desk

मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली

News Desk