HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईत भाजपला धक्का, आजी, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबई | भाजपला गेले अनेक दिवस बरेच धक्के मिळत आहेत. भाजप पक्ष सोडून अनेक जण राष्ट्रवादीत किंवा अन्य पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. नवी मुंबईत भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनी पक्ष प्रवेश केला आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. यापूर्वी ३ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. आता राष्ट्रवादीने भाजप नेते गणेश नाईक यांना धक्का दिला आहे. त्यामुळे भाजपला आणखी किती धक्के पचवावे लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये , राऊतांचा भाजपला टोला!

News Desk

लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे

Aprna

कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट- IMD

News Desk