HW News Marathi
Covid-19

“एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?”, भाजपने मुख्यमंत्र्यांना डिवचले

मुंबई । भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या भूमिकांबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना केशव उपाध्ये म्हणतात की, “स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायचं ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे. सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं”, असे म्हणत भाजपने ठाकरे सरकारला सुनावले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोनास्थिती योग्यरित्या हाताळल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. मात्र, याबाबत बोलताना केशव उपाध्ये म्हणतात की, “वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा. कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?”, असा केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, “आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं त्यासारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR एजेंन्सी वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ

News Desk

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

Aprna

कशावर कोणाचा फोटो टाकायचा ते कळत नाही का ?

News Desk