HW News Marathi
Covid-19

परिवहन मंत्री अनिल परब यांची हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी

मुंबई। राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थिती मध्ये राज्य सरकारचे मंत्री आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय अभाव असल्याचे चित्र दिसू लागले आहे. लाॅकडाऊन ३ सुरू झाल्यानंतर शासनाच्या आदेशानंतरही अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यानी वेगळे निर्णय घेतले त्यामुळे सरकार एक निर्णय घेते आणि प्रशासकीय अधिकारी वेगळे अशी परिस्थिती निर्माण झाली.

अशामध्ये परिवहन मंत्रालयाच्या घुमजाव भूमिकेमुळे सामान्य नागरिकांचा संताप झाला. राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी मोफत सेवा देईल असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले त्यानंतर परिवहन विभागाने मात्र ही मोफत सेवा फक्त परराज्यात जाणाऱ्या मजुरांसाठी असल्याचे सांगून सामान्यांचा रोष ओढावून घेतला. आज परिवहन मंत्र्यांनी सुद्धा ही सेवा फक्त मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी आहे हे जाहीर केले.

परिवहन विभागाच्या या गलथान कारभारामुळे गावी जाण्याच्या आशेने आज मुंबईतील परळ डेपोवर लोकांना गर्दी केली.अशा परिस्थितीमध्ये कोरोना संकटाच्या काळात एसटी प्रवासाबाबत चुकीची माहिती देऊन लोकांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या परिवहनमंत्री अनिल परब यांची तात्काळ हकालपट्टी करा..अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल स्थापन

News Desk

व्यवस्थेचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही | जयंत पाटील

News Desk

कोरोनाकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा ! ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार

News Desk