HW News Marathi
Covid-19

सनी लिओनी म्हणते… कोरोनाची परिस्थिती पाहाता माझ्या मुलांसाठी भारतापेक्षा अमेरिका जास्त सुरक्षित !

मुंबई। देशात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात तिसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित केला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहाता माझ्या मुलांसाठी अमेरिका जास्त सुरक्षित असल्याचे सांगत बॉलिवूड सनी लिओनीने म्हटले आहे.

सनी लिओनी आणि पती डॅनिअल वेबर यांनी आपल्या तीन मुलांसह देशातील लॉकडाउन काळात अमेरिकेत केली आहे. सनी लिओनी आपल्या ३ मुलांसह इन्स्टाग्रामवर फोटो टाकत सोशल मीडियावर यासंदर्भातली माहिती दिली आहे. सनी लिओनीचा पतीने डॅनिअलनेही स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे.

देशात आज (११ मे) कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यापैकी २०९१७ जण बरे झाले असून आता ४४०२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण आढळून आले. तर १५५९ जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ३१.१५ टक्क्यांवर गेले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या!

News Desk

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

News Desk

काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण

News Desk