HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द

अहमदनगर | नगर महापालिकेतील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला आहे. बाधकांम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना अपशब्द वापरल्याचा ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

छिंदम यांना त्यांच्या प्रभागातील काम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी हवे होते. ‘शिवजयंती झाल्यानंतर आम्ही, तुमचे काम करुन देतो’ अशी विनंती पालिका कर्मचारी अशोक बिडवे यांनी केली होती.

छिंदम यांचे काम करण्यास विलंब होणार असल्याचे कळताच, कर्मचाऱ्यावर पदाचा रोप दाखवताना त्यांची जीभ घसरली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि शिवजयंतीबद्दल अपशब्द भाषा वापरली. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी यूनियकडे तक्रार केली असून त्यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“तुम्हा सगळ्यांना मीच पुरुन उरेल…”, चित्रा वाघ भडकल्या

News Desk

इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार! – नाना पटोले

News Desk

“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

News Desk
देश / विदेश

नीरव मोदींच्या मालमत्तांवर टाच, २० ठिकाणी छापे

swarit

मुंबई – सुमारे अकरा हजार ३६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी परदेशात फरार झालेल्या डायमंड किंग नीरव मोदींच्या अनेक मालमत्तावर सलग दुसऱ्या दिवशी जप्तीची कारवाई करण्यात आली. सीबीआयने गीतांजली ग्रुपच्या मेहुल चोक्सीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय पथकाकडून गीतांजली ग्रुप आणि कंपनीशी संबंधित देशभरातील ५ राज्यांमधील विविध शहरातील २० जागांवर छापे मारण्यात आले आहेत. हा गुन्हा १३ फेब्रुवारीला दाखल करण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे,गुजरातमधील सुरत, राजस्थानमधील जयपूर शहर, तेलंगाणामधील हैदराबाद आणि तामिळनाडूतील कॉईंबतुर या ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. गीतांजली ग्रुपच्या मेहुल चोक्सीसह कंपनीच्या इतर संचालक यांच्या घर, कार्यालय आणि कारखान्यांवर मारण्यात आले आहे.

Related posts

अंतिम परीक्षेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

News Desk

तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू

News Desk

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ दोन खेळाडूंना कोरोनाची लागण…

News Desk