HW News Marathi
Covid-19

राज्यात ऑक्सिजन आणि रेमीडिसिव्हीरचा जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच !

मुंबई । देशभरात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग हा महाराष्ट्रात आहे. एकीकडे सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा तर दुसरीकडे आरोग्यव्यवस्थेवर असणारा प्रचंड ताण आहे. लसींच्या पुरवठ्यापासून ऑक्सिजनपर्यंत सगळ्याचाच मोठा तुटवडा आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे या आरोग्यविषयक गोष्टींच्या या आवश्यक पुरवठ्याची वारंवार मागणी केली जात आहे. मात्र, राज्यातील या तुटवड्याबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा दावा केला आहे. “राज्यात ऑक्सिजन आणि रेमीडिसिव्हीरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जात असल्याने उर्वरित जिल्ह्यांवर अन्याय होतो”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्राला गंभीर कोरोनास्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार ऑक्सिजन आणि रेमीडिसिव्हीरचा इंजेक्शन्सचा साठा पुरवत आहे. मात्र, या मदतीचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन आणि रेमीडिसिव्हीरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच केला जात आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाविकासआघाडीतील मंत्र्यांना सुनावताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यातील मोठे नेते हे केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांसाठी घेऊन जात आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी अशी मानसिकता ठेवणे योग्य नाही.”त्याचप्रमाणे, लोकांच्या मनातील भीतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की लोक लगेच रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. त्यामुळे आधी लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

News Desk

देखभाल दुरूस्तीसाठी कार्यालये उघडण्याच्या मागणीवर उच्चाधिकार समिती निर्णय घेणार । सुभाष देसाई

News Desk

करोनाची तिसरी लाट; पुढील तीन महिने महत्त्वाचे, केंद्राचे राज्यांना तयार राहण्याचे निर्देश

News Desk