HW News Marathi
Covid-19

हे तर ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

मुंबई । “हे भ्रमित ठाकरे सरकार आहे”, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर आज (१ जुलै) बोचरी टीका केली आहे. त्याचप्रमाणे, “महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे की अनलॉक ? अर्थचक्र फिरवायचे की २ किमीमध्ये फिरायचे ?”, असा खोचक सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, राज्य सरकारने तातडीने लोकांच्या मनातील हा संभ्रम दूर करावा, अशीही मागणी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर ही टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील आपल्या ट्विटमध्ये महाविकासआघाडीवर टीका करताना असे म्हणतात की, “महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे की अनलॉक ? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे असे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त २ किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे. तुम्ही काय ते एकदा ठरवा. अर्थचक्र फिरवायचे का ? की २ किमीमध्येच फिरायचे ? तातडीने निर्णय घ्या आणि जनतेचा संभ्रम दूर करा”, असे चंद्रकांत पाटील म्हणतात.

राज्य सरकारकडून ‘मिशन बिगीन अगेन’च्या अंतर्गत हळूहळू काही नियमांत शिथिल आणण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात ‘अनलॉक’च्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जुलै महिन्यापासून राज्यात या अनलॉक प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारसह मुंबई पोलिसांकडूनही नागरिकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईकरांना केवळ कार्यालय आणि अत्यावश्यक कारण वगळता इतर कोणत्याही कारणासाठी त्यांच्या घरापासून २ किमीहून बाहेरच्या परिसरात जाण्यास मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटने वाढ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

News Desk

लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख

News Desk

राज्यात आज पुन्हा ३० हजारांच्या आत आढळले रूग्ण तर बरे डिस्चार्ज रूग्ण संख्या वाढली

News Desk