HW News Marathi
महाराष्ट्र

बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है…!

मुंबई | महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पवार सांगली म्हणाले होते की, “मी काही बरे-वाईट केले म्हणून तुरुंगात गेलो नाही,” असे विधान करत गृहमंत्री अमित शहांना टोला लगावला होता.

पवारांच्या विधानाला भाजपच्या प्रत्यूत्तर देत भाजप महाराष्ट्रच्या ट्वीट हँडलवर रम्याचे डोस या व्यंगचित्राच्या माध्यमांतून पवारांवर टीका केली, ” तुरुंगात न गेल्याचे बिरुद मिरवणाऱ्यांना रम्या म्हणतो, असे व्यंग चित्रच्या माध्यमातून “बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है…!” अशा पवारांना उद्देशून टीका केली आहे. या ट्वीटमध्ये हॅशटॅग #रम्याचेडोस #BaramatiKaramati देण्यात आले असून पवारांना टॅग केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पुढील महिनाभर प्रचारासाठी मुंबईबाहेर असणार आहे. त्यामळे मी उद्या (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता स्वत: मुंबई येथील ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आयुष्यात कारवाईचा दुसरा प्रसंग असल्याचे पवारांनी काल (२५ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकारने कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केलेली नसल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोअरवेलमध्ये अडकला ६ वर्षीय मुलगा

News Desk

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-एसटीमध्ये जोरदार धडक

News Desk

दिवसाढवळ्या भररस्त्यात खून झाल्याने बीड शहरात खळबळ

News Desk