HW News Marathi
Covid-19

शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक, आरोपींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार !

मुंबई । माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच पेटत आहे. या प्रकरणानंतर संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांना जामीन मिळाल्याने भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपकडून पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “जोपर्यंत या आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार”,असा इशाराच दिला आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक

“शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण केली तो प्रकार अतिशय निंदनीय आहे. या निवृत्त अधिकाऱ्याला त्याच्या घरात घुसून मारहाण झाली. मात्र, आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन उघडकीस आणले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज दिले.

आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबतची संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अॅक्टिव्ह झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले मात्र लगेच जामीनावर सोडून दिले. पोलिसांनी या प्रकरणी जी कलमे लावणे अपेक्षित होते ती लावली गेली नाहीत. म्हणूनच, आम्ही हे आंदोलन करत आहोत. संबंधित आरोपींवर योग्य कलमे लावण्यात यावीत हीच आमची मागणी आहे. आता आम्हाला पोलिसांनी कलमं वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याप्रमाणे झाले नाही तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू”, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचे आश्वासन

IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे, आम्ही आवश्यक त्या कलमे वाढवू असे आश्वासनही विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमध्ये आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची महत्वाची घोषणा

News Desk

ज्यांचा पराभव होणार असतो ते आधीच तयारी करतात…! जयंत पाटलांनी डिवचलं

News Desk

राज्यात आज कोरोनाचे ३३९० नवीन रुग्णांची नोंद, तर १६३२ रुग्णांना घरी सोडले

News Desk