HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिक यांची मंत्री मंडळातून हकलापट्टी करा; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | अंडरवल्ड डाँन दाऊदच्या हस्तकांशी थेट आर्थिक व्यवहार करणा-या नवाब मलिक यांची मंत्री मंडळातून कालपट्टी करा, देव देश आणि धर्मासाठी आता बोलून नाही तर करून दाखवा, असे जाहीर आवाहन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांना आज येथे केले. अन्यथा भाजपा आंदोलन अधिक तिव्र करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबई भाजपा कार्यालयात आज आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीने अटक केलेल्या नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची मागणी करतानाच हे प्रकरण कसे गंभीर आहे याकडे एकदा लक्ष वेधले.

यावेळी ते म्हणाले की, गेले काही दिवस राज्यातील मंत्री आणि पीएमएलए कायद्या अंतर्गत आरोपी असलेले आणि ईडीने अटक केलेले मंत्री नवाब मलिक यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्री मंडळातून हकालपटृी करावी, त्यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी भाजपा करीत आहे. मुख्यंमंत्र्यांनी देशहितासाठी ताठ मानेने उभे रहावे , मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावासमोर झुकू नये, झुंकेगे नही हे आता बोलण्यासाठी नाही तळ करून दाखवण्याची ही वेळ आहे, असे सांगत आमदार अँड आशिष शेलार पुढे म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जितील पोलीस आयुक्त नियुक्त केले आहेत त्यामुळे थेट पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत, दाऊद, हस्तक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिक यांच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करावेत, फौजदारी गुन्हे दाखल करुन गोदीवाला कंम्पाऊडसह आज वांद्रे-कुर्ला काँम्पलेक्स मधील समोर आलेले प्रकरणासह अजून किती नेत्यांच्या किती ठिकाणी दाऊदच्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा करीत आहे असे आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणा देशहितासाठी जो तपास करीत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे, देव देश आणि धर्मासाठी हे जे ते बोलत असतात ते आता करून दाखवण्याची वेळ आली आहे त्यासाठी कुणासमोर ही झुकू नका, भाजपा आपल्याला या मुद्यावर सर्व राजकीय मुद्दे बाजूला ठेवून समर्थन देईल, असेही त्यांनी सांगितले. तीन पक्षांमध्ये अपेक्षा करावा कसा एकच पक्ष असून म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, ते याबाबत विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निवेदन करावे, अशी मागणीही आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

काहीजण या विषयाला भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत नवाब मलिक यांची अटक राजकीय असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत त्यामुळे याबाबतचे सत्य समोर येण्याची गरज आहे असे सांगत त्यांनी याबाबतचा घटनाक्रम व पाश्वभूमी मांडली.

1) याबाबत पहिला गुन्हा ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ साली झाला असून इक्बाल कासकर आणि मुमताज शेख या दोघांच्या विरोधात मालमत्तेचा ताबा आणि खंडणीप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला.त्यानंतर २६ सप्टेंबर २०१७ ला ईडीने ईसीआर नोंद केली

2)त्यानंतर इक्बाल मिरचीचे प्रकरण समोर आले. २०१९ मध्ये इक्बाल मिरचीच्या प्रकरणात ईडीने ईसीआर केला.

3) एनआयए ने ३ फेब्रुवारी २०२२ साली एफआयआर नोंद झाला, दाऊद, छोटा शकिल, जावेद चिकना, टागर मेमन या बाँम्ब ब्लास्टमधील आरोपींच्या विरोधात हा गुन्हा नोंद झाला

या तीन्ही प्रकरणातील ईडीची सुयुक्त चौकशी सुरू असून आज “जे उखाड दिया.. “असे म्हणत आहे त्यांना हे माहित असणे आवश्यक आहे. हे शब्दशून असणा-यांना निर्णय शूर असणारे भाजपा सरकार काय कतेय हे माहित नाही. दाऊदला उखाड दिया करायचे असल्याने सरकारने २०१७ पासून या चौकशा सुरू केल्या आहेत.

दशहशवाद्यांना मदत, काळ्या पैशांची अफरातफर, गुन्हेगारांशी संग्नमत, अधिकृत मालमत्ता हडप करणे व लष्करेतोयबा, जैशेमोमद, अलकायदा या आंताराष्ट्रीय टोळयांशी या सगळया प्रकरणांचा चौकशा सुरू असून त्याला राज्य सरकार विरोध का आहे?, या चौकशा राज्य सराकर का थांबवते आहे? त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची बोटचेपी भूमिका का आहे? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी करीत हे मर्दाचे सरकार आहे तर मग करून दाखवा असा टोलाही आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

सरकारची न्यायीक भूमिका कोणती आणि प्रथमिकता कोणती?

राज्यातील आघाडी सरकारची प्रथमिकता कोणती आणि न्यायीक भूमिका कोणती ? हे कळायला मार्ग नाही. मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तर त्यांचा राजिनामा घेण्यात आला तर त्यापेक्षा भयंकर आरोप नवाब मलिक यांच्यावर झाले पण त्यांचा राजिनामा घेतला जात नाही. आझाद मैदानात आमचे छत्रपती संभाजी राजे उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडेपर्यंत सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्यासाठी टाहो फोडायला सगळे मंत्री मंडळ एकवटले, एकिकडे छत्रपती संभाजी राजेंकडे लक्ष दिले जात नाही पण नवाब मलिक यांना औषधोपचार योग्य होईल म्हणून काळजी घेतली जाते. हे ठाकरे सरकर आडनावे बघून भूमिका घेते का? काही विशिष समाजातील विशिष्ट आडनावाच्या माणसांची विशेष काळजी सरकार घेते का? दाऊद, इक्बाल कासकर, हसिना पारकर, जावेद फ्रुट, सरकार शहावली खान, छोटा शकिल अशी नावे आली म्हणून तुम्ही या चौकशा थांबवा असे म्हणताय का? असा सवालही आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना धमकी देणारा आहे तरी कोण? – सुधीर मुनगंटीवार

News Desk

उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध! – आदिती तटकरे

Aprna

कोल्हापूर शिवसैनिक बेळगावच्या दिशेने लाल-पिवळा ध्वज हटवण्यासाठी रवाना

News Desk