HW News Marathi
Covid-19

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी

मुंबई | कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः कुलपती म्हणून राज्यपालांनी लक्ष द्यावे. आँनलाईन शिक्षण, त्याची साधने, मुल्यांकन व शैक्षणिक दर्जा याबाबत टाक्स फोर्स नियुक्त करा, अशी मागणी करीत आज भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची आज (३० एप्रिल) भेट घेतली.

कोरोनामुळे आर्थिक नुकसान जसे होणार तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही होणार आहे. शिक्षणामध्ये प्रत्येक वर्षे महत्त्वाचे असल्याने एकिकडे राज्य आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दुष्टीने उभे करावे लागणार आहे, तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वेळीच तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. माजी शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी काल शाळांंनी केलेली फी वाढ शासनाच्या निदर्शनास आणून दिली तसेच आज उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या, तसेच शालेय व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये किमान 10 टक्के सवलत द्यावी यासाठी शासनाने निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.

तसेच आज कुलपती म्हणून राज्यपालांची राजभवनावर भेट घेऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आमदार अँड. आशिष शेलार यांनी मांडले. कोरोनाव्हायरस मुळे यावेळी सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु करावे लागणार आहे, तशा युजीसीने ही निर्देश दिले आहेत. जर त्यासाठी शिक्षण संस्था सज्ज नसतील तर कुलगुरू म्हणून आपण तज्ञांचा एखादी समिती अथवा टाक्स फोर्स गठीत करुन संस्थांंना मार्गदर्शन करण्यात यावे. व ऑनलाइन शिक्षण व प्रशासनाचा एक रोडमॅप तयार करण्यात यावा. ऑनलाइन शिक्षण, संस्था कार्य व प्रशासन, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, यासाठी पुढील दोन-तीन आठवड्यांत एक योजना तयार करणे आवश्यकता असून त्यामुळे सुसुत्रता येईल. आँनलाईन शिक्षणासाठी दूरदर्शन सह्याद्री चॅनेल, एचआरडी चॅनल, इत्यादी माध्यमांचा उपयोग करण्याबाबत विचार केला जावा. आँँनलाईन शिक्षण व मुल्यमापन तांत्रिक दुष्ट्या सुरक्षित असावे यासाठी आयटीतील

सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे.

राज्य सरकार आणि शैक्षणिक संस्थांनी संगणक, लॅपटॉप आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर निर्माते आणि बँक यांच्यात सुलभता निर्माण केली पाहिजे. जेणेकरुन संस्था व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. विद्यार्थी फी कर्ज योजना उपलब्ध आहे त्यामध्ये अशा बाबी समाविष्ट करण्यात याव्यात.ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची साधने या योजनेत समावेश करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांंना वीज बिल व अन्य शैक्षणिक साधनांचा खर्च यावेळी कमी होणार असल्याने यावेळी किमान दहा टक्के सुट विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशा विविध मागण्या आमदार अँड आशिष शेलार यांनी केल्या आहेत. यावेळी त्यांच्या सोबत अँड. अमित मेहता ही उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! मुंबईत २९ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

News Desk

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

Aprna

नाशिक, नांदेड, परभणीत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk