HW News Marathi
महाराष्ट्र

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीचे रूप बदलले. लाखो भाविकांच्या सोबतीने नाही तर यावेळी तीनही पालख्या एस.टीतून विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या. यावर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्या आहेत. भाजप नेते अवधूत वाघ यांनीही आमदारांसाठी मर्सिडीज आणि माऊलींच्या पादुकांसाठी लाल डब्बा असा टोला लगावला होता. आता पुन्हा एकदा भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर केली आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळा lने घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे.हे

हेलिकॉप्टरच्याता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही ७१ हजार रुपयांचं बिल फाडलं. निर्लज्ज सरकार, अशा शब्दांत भातखळकरांनी सरकारवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण

swarit

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात, कोरोना योद्ध्यांना केले अभिवादन

News Desk

विधानसभेसाठी भाजपचा नवा नारा “फिर एक बार शिवशाही सरकार”

News Desk