HW News Marathi
Covid-19

शिव वडापावनंतर आता शिव दवाखाना, डॉक्टरांऐवजी कंपाउंडर असणार !

मुंबई   |  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांना त्यांच्यावर टिका केल्या. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून देखील टिका करण्यात आल्या. “शिव वडापाव, शिवथाळीच्या यशानंतर आता शिव दवाखाने येणार आहेत”, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळत, असे वक्तव्य एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

काय केली टिका ?

“शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील,” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली.

 

काय म्हणाले होते संजय राऊत ?

“मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो. त्याला जास्त कळतं,” असे वक्तव्य केले होते. यावरुन डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मार्डने राऊत यांनी माफी मागण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली. चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झाली. गैरसमज कुणी करू नये, माफी मागण्यास काही जण सांगत आहेत पण मी अपमानच कुणाचा केलेला नाही त्यामुळे माफी मागणार नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले होते.कोरोना संकटाच्या काळात देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. अशा डॉक्टरांविषयी आम्हाला नेहमीच आदर आणि आस्था आहे. अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्या, असे संजय राऊत म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक! लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल… कुठे काय सुरु काय बंद? जाणून घ्या

News Desk

चिंताजनक! राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ हजार ८१४ विक्रमी नोंद

News Desk

कोरोनाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणार – किशोरी पेडणेकर

News Desk