HW News Marathi
महाराष्ट्र

ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमध्ये खुलतो ते… 

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे राज्यात लॉकडाऊन आहे. मात्र, हळूहळू राज्य एकीकडे अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र भाजप सरकार मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे कोरोनाचे संकट राहिले बाजूलाच पण सत्ताधारी आणि विरोधक असे सत्तानाट्य पाहायला मिळत आहे. कोरोनासारख्या या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलनदेखील केले होते. यावर सामनातून जहरी टीका करण्यात आली. याच टीकेला आता भाजपकडूनही प्रत्यूत्तर देण्यात आले आहे.

‘ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमुळे फुलतो त्यांची वृत्तपत्रं मंदिरं बंदीच्या बाजूनेच बोलणार’ अशी आक्रमक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या आंदोलनावर जहरी टीका करण्यात आली. ‘भाजपचं घंटानाद आंदोलन हे धार्मिक होतं की राजकीय?’ असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला. त्यावर भातखळकर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

“ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्या नेत्यांची वृत्तपत्रे मंदिर बंदीच्या बाजूनेच बोलणार. दारुची दुकाने उघडल्यानंतर जसा पैसा आला तसा पैसा जर का मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर आला असता तर आत्तापर्यंत केव्हाच मंदिरांचे दरवाजे सताड उघडले ठेवले असते. लोकांच्या भावना आणि परिस्थिती अशी आहे की, मंदिरं उघडावीच लागतील. नाहीतर यांना दुसरा कोणत्याही पर्याय राहणार नाही, हे लक्षात ठेवावे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेने उन्माद पसंत पडलेला नाही, सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात !

News Desk

मोहन डेलकर प्रकरणाप्रमाणे लक्षद्वीपचाही छळ सुरू, सेनेचा घणाघात

News Desk

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk