HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बोलावली तातडीने बैठक

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे ‘वर्षा’ बंगल्यावर उपस्थित आहेत. बैठकीत संघटनाकत्मक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीमागे नेमकं काय कारण आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांची नियमितपणे संयुक्त बैठक पार पडत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला – सामना

News Desk

आज होणार माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भविष्याचा फैसला

News Desk

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”, सेनेचा मोदी सरकारला सवाल

News Desk