HW News Marathi
महाराष्ट्र

मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही – एकनाथ खडसे

मुंबई | “मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही. मी स्वस्थ बसणारा राजकारणी नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल”, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

“बाकीच्यांवर कारवाई होत नाही. माझ्यावर का कारवाई करण्यात आली. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?”, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

“नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे भाजप सरकार येऊ शकले नाही. ओबीसींवर अन्याय बहुजनांवर अन्याय मग त्या कालखंडात या धोरणामुळे बहुजनांची तिकीटं कापली. ज्यांना तिकीट दिली त्यांना हरवलं. माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न केला. याबबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत तरी देखील कारवाई होत नाही?”, असं खडसेंनी सांगितले. “मी असा काय गुन्हा केला. जे लोक या विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले. मी कधीच पक्षावर टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेलं भाजपचं सरकार गेल्याची खंत देखील खडसेंनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निरुपम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

swarit

संजय राऊत यांनी कुटुंबाची माफी मागितली नाही तर… भाजप आमदाराचा इशारा

News Desk

‘हनुमान चालिसा’मुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर आम्ही रोज म्हणू, फडणवीसांचे राज्य सरकारला आवाहन

Aprna