HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंनी मोदींविरोधातील रिट्विट केलेले ट्विट केले डिलिट

मुंबई | भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदींनी काल (२० ऑक्टोबर) देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केलेले एक ट्विट रिट्विट केले. या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असे जयंत पाटलांनी म्हटले होते. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली होती. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रमुख नेते खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत, असे सांगत होते. मात्र, आता खडसे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर याला काय वळण येणार हे पाहणे गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिस भरती प्रक्रियेत SEBCचे आरक्षण ठेवणार नाही

News Desk

 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ!, दरेकरांची मागणी

Aprna

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर भर! – मुख्यमंत्री

Aprna