HW News Marathi
महाराष्ट्र

इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात घाबरायचं नाही ! । गणेश नाईक

नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आल्या असून राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना भाजप नेते गणेश नाईक यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. “इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही”, असे विधान गणेश नाईक यांनी केले आहे.

नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असताना शिवसेनेने नाईक गटाचे नगरसेवक फोडले आहेत. गणेश नाईक यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. दरम्यान, तुर्भेमधील भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी हे विधान केले आहे. त्यावर लगेच शिवसेनेचे प्रत्युत्तर देखील आले असून “गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत”, असे शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटले आहे.

गणेश नाईक नेमके काय म्हणाले?

गणेश नाईक आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, “कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही”,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल – नारायण राणे

News Desk

अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर – जयंत पाटील

News Desk

शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला; आंबादास दानवेंचे पोलीस महासंचालकांना पत्र

Aprna