HW News Marathi
महाराष्ट्र

बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं ! गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना डिवचले

पंढरपूर । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात सध्या चांगलीच गाजत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी असे दोन्ही पक्षांचे नेते इथे वादळी प्रचारसभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर, नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एका प्रचारसभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. मात्र, आता गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. “असली टगेगिरीची भाषा अजित पवारांना शोभत नाही. बोलायचं टग्यासारखं आणि रडायचं बाईसारखं अशी अजित पवारांची गत आहे”, असा जोरदार टोला गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लगावला आहे. ते आज (९ एप्रिल) पंढरपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ईडीची नोटीस आल्यानंतर तुम्हाला राज्याने रडताना पाहिलेय !

“अजित पवारांचे बोलणं टग्याचं आणि रडणं बाईसारखं अशी गत आहे. ईडीची (ED) नोटीस आल्यानंतर तुम्हाला राज्याने रडताना पाहिलेले आहे. अजित पवारांचे सगळे राजकारणच चुलत्यांच्या जीवावर आहे. पण आमचे राजकारण हे बारा बलुतेदार आणि गोरगरिबांच्या पाठींब्यावर आहे”, असेही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.

अजित पवारांनी स्वतःची लायकी काय हे इथल्या लोकांना सांगावे !

अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “माझ्यावर टीका करण्याआधी अजित पवारांनी स्वतःची लायकी काय आहे हे इथल्या लोकांना सांगावे. माझं डिपॉझिट जप्त झाले हे जगजाहीर आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर मी माझा हक्काचा मतदारसंघ सोडून बारामतीत येऊन निवडणूक लढलो. मला लोकांनी नाकारले. मात्र, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारही मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढला. तिकडे त्यालाही अपयश आले. तेव्हा काय झालं?” असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना डिवचले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

News Desk

“अर्णब गोस्वामींच्या मुद्यावर भाजप गप्प का?” राऊतांचा सवाल

News Desk

मराठा आरक्षणासाठीच्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश, नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

News Desk