HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल परबांची साडी-चोळी, नारळ देऊन ओटी भरणार!”, पडळकरांची जहरी टीका

मुंबई | अनिल परबांची साडी-चोळी देऊस, नारळ देऊन ओटी भरणार, अशी जहरी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्याचं परिवहन मंत्री अनिल परबा यांच्यावर केली आहे. एसटी कर्मचारी महिला अनिल परबांची भाऊ भीजचं भेट म्हणून साडी-चोळी आणि नारळ देऊन ओटी भरणार आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी भाऊभीजचा भेट द्याचा, आज महिला अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळ देऊन त्यांची ओटी भरणार आहेत. त्यासाठी आज (२० नोव्हेंबर) ४ वाजता आपल्या आझाद मैदानातील महिला अनिल परब यांच्या बंगल्याकडे जातील. पडळकरांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हणालं.

सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन फोडून पाहत आहेत. परिवहन विभागभ्रष्ट करण्यात सरकार मग्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एसटीतील भ्रष्टाचार थांबवला तर कर्मचाऱ्यांचा परगार हा इतर महामंडळापेक्षा जास्त असेल. पण, राज्य सरकारला हा भ्रष्टाचार थांबवायचा नाही. कारण त्यांचा जीव तेथे अडकला आहे, असा आरोप पडळकरांनी सरकारवर केला आहे. आझाद मैदानात आज मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी उपस्थित आहेत. कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या आहेत

बोलायचं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांशी बोला | पडळकर

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे नेतृत्व ही आहे, असे परबांनी काल (१९ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणालं. यावर पडळकरांनी प्रत्युत्तर दिले की, “बोलायचं कोणाबरोबर येथे तुमचे बाप-आई बसलेत. त्यांच्याशी ऐवून बोला. आझाद मैदानात मी बोलत असताना माझा आवज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जात असेल. तर हा आवाज एसटी कर्मचाऱ्याचा आवाज आहे. जर तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलता, असे म्हणत सरकारवर टीका केली. एसटीचे राज्यात विलीनीकरण करा, एवढी मागमी आहे. दुसरी, तसरी आमची मागणीच नाही, असेही ते यावेळी म्हणालं.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय?”, हायकोर्टाने केला सवाल

News Desk

बँकिंग कायदा दुरुस्तीविरोधात लढा उभारा, शरद पवारांचा केंद्रविरुद्ध लढा

News Desk

‘ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का?’ चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्याना कटू सवाल

News Desk