HW News Marathi
महाराष्ट्र

मुक्ताईनगरमध्ये भाजपला आणखी एक धक्का, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव भाजपला बसणारी धक्क्याची मालिका सुरुच आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवे केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला आणि गिरीश महाजन यांना हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

एकेकाळी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये अडगळीत पडले होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याची साखळी सुरुच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगावमध्ये भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा झाला महापौर

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का मानला गेला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे 2 दिवसांत पंचनामा करण्याचे आदेश

News Desk

सोशल मीडियाला संपवणं, लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा डाव, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

मुंबईतील नामवंत डॉक्टर्स कोरोना लढाईत शासनाबरोबर, टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार

News Desk