HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणामुळे घेतली थेट शरद पवारांची भेट!

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर बॅकफूटवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत. आज (६ एप्रिल) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेले सिल्व्हर ओकवर सकाळी भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे, नूतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवार यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा सुरु झाली होती.

उदयनराजे यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठविले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात उदयनराजे यांच्या विरोधाची धार अधूनमधून तीव्र होत होती.

मात्र, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे पवारांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांनी भेट घेतल्याचे सांगितले जात असले तरीही राजकीय चर्चा या सुरुच आहेत. उदयनराजे यांच्यापाठोपाठ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पवारांची भेट घेतली. ‘पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो. त्यांचे मार्गदर्शन घेतले.’ असे त्यांनी पत्रकारांशी बोलाताना सांगितले आहे.

मराठा आरक्षणावरही उदयनराजे यांची भूमिका आक्रमकच आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांचे पित्ताशयाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज दिला होता. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप, वकील जयश्री पाटील यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका, त्यावर दिलेला निकाल आणि देशमुख यांचा राजीनामा यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटरवर गेली आहे. राजकीय घडामोडींचे केंद्र अर्थात सिल्व्हर ओक हेच राहिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

News Desk

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Aprna

नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा कब्जा

News Desk