HW News Marathi
महाराष्ट्र

“मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता पण आता…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

पंढरपूर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.

“मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला”“विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार” असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काही दिवसांपूर्वी सरकोली येथे गेले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली होती. तेव्हापासूनच कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

काळेंसह पवारांकडूनही संकेत

“आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु” असं कल्याणराव काळे त्यावेळीच म्हणाले होते. “सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊन निर्णय घेऊ. कल्याणराव, सगळ्यांना म्हटलंय हं.. सगळ्यांना बरोबरीत घेऊन निर्णय घेऊ. सगळे येतात, एकत्र चर्चा करतात, त्याचं काय वेगळं होणार आहे का?” असं पवारही त्यावर मिश्किलपणे म्हणाले होते.

विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश

कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. मात्र २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक येऊ घातली आहे. या निवडणूकीच्या ऐन वेळी भाजपला एका मागोमाग एक धक्के बसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चौकशीची खूपच घाई असेल तर…”,समन्सला रश्मी शुक्लांचं उत्तर

News Desk

पीएमजीपी वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय येत्या महिनाभरात! -मंत्री जितेंद्र आव्हाड

Aprna

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Aprna