HW News Marathi
महाराष्ट्र

‘राष्ट्रवादीत चाललो’ भाजपच्या कल्याणराव काळेंनी धाडला निरोप!अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

पंढरपूर | राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या तोंडावर भाजपला धक्के बसत आहेत. भाजपचे नेते कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. गुरुवारी म्हणजेच ८ एप्रिलला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दौऱ्यात ते भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. मनधरणीसाठी आलेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अजित पवारांबरोबर ठरलंय? असा निरोप दिल्यानं निंबाळकर परतले.

काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार बुधवारी बारामती येथे अजित पवार यांच्याशी झालेल्या अंतिम चर्चेनंतर काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला. गुरुवारी अजित पवार यांच्या दौऱ्यात ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याची कुणकुण लागताच खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात मनधरणीसाठी गेले होते. त्याचवेळी संजय शिंदे आल्याने दोघांचीही पंचाईत झाली होती.

कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर ते आश्वासन पाळले नसल्याने काळे भाजपवर नाराज होते. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, अधिकृत प्रवेश केला नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे कल्याणराव काळे हे भाजप पक्षात अस्वस्थ होते. मात्र, कोणत्याही मोठ्या निवडणुका नसल्याने भाजपकडून त्यांच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. कल्याणराव काळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत जाण्याचे जवळपास निश्चित केल्याची कुणकुण लागली. तेव्हा भाजपचे नेते, माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी काळेंनी पक्ष न सोडता भाजपसोबत राहावे यासाठी प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांशीही संपर्क करून दिला. मात्र, काळे आपल्या मतावर ठाम होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानखुर्द येथील मंडाला येथे केमिकल गोदामाला भीषण आग

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

News Desk

मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कायम ?

News Desk