HW News Marathi
महाराष्ट्र

माझी हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन!; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

मुंबई |  ठाकरे सरकारनी माझी हत्या करण्याचा कट केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी पुण्यात शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यावरून त्यांनी पोलिसांवर देखील ताशेरे ओढले आहे. सोमय्यांनी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सोमय्या म्हटले, “मनसुख हिरेन प्रकरणानंतर आता माझी हत्या करण्याचा कट हा ठाकरे सरकारचा प्लॅन केला आहे. उद्या मी राज्यपालांना भेटणार, गुरुवारी मी केंद्रीय गृह मंत्रालयाला माझा रिपोर्ट देणार आहे. आणि मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढूनच स्वस्थ बसणार आहे.” 

सोमय्या म्हटले, “मनसुख हिरेन प्रकरणानंतर आता किरीट सोमय्याची हत्या करणे हा उद्धव ठाकरे सरकारचा प्लॅन आहे. परवाच्या पुणे घटनेचे एकएक व्हिडिओ क्लिप पुढे आले. दगड, लाठी, काठी ज्या पद्धतीने हल्ला झाला. आणि पुणे पोलीस स्वस्थ आहेत. कारण, संजय राऊत, अनिल परब आणि उद्धव ठाकरेंचे मेहूणे पाटकनकर यांचे घोटाळे बाहेर यातात. म्हणून किरीट सोमय्यांना गप्प बसवायचे आहे. मला फक्त मोदी सरकारच्या सिक्युरीट रक्षकांनी मला वाचविले. उद्या मी राज्यपालांना भेटणार, गुरुवारी मी केंद्रीय गृह मंत्रालयाला माझा रिपोर्ट देणार आहे. आणि मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढूनच स्वस्थ बसणार आहे.” 

पुण्यातील शिवसैनिकांनी आणि सोमय्यामध्ये गोंधळ

किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला होता. या संदर्भातच भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यासाठी ते शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर सोमय्या पुणे महापालिकेत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र यादरम्यान परिसरात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सोमय्या महापालिकेत पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांची गाडी अडवली. तर काहींनी त्यांच्या गाडीसमोर लोटांगण घालत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे तेथील वातावरण तणावाचे बनले होते. तसेच यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना परत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मागे परतताना सोमय्या पायऱ्यांवरून खाली पडले. यावेळी त्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नेमकं काय झालं ?

सोमय्या शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा! -बाळासाहेब थोरात

News Desk

“चूक नसलेल्यांना शिक्षा केली, तर काय करायचं?”, शेलारांचा शरद पवारांना सवाल

News Desk

आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, खुशाल आमची चौकशी करा..

Arati More