ठाणे | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन येथील अनाधिकृत इमारतींचा ११ कोटींचा दंड महापालिकेने वसूल करावा तसेच सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाणे महापालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. किरीट सोमय्या यांच्यासमवेत आमदार निरंजन डावखरे तसेच ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक देखील सहभागी झाले होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी किरीट सोमय्या आणि आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना यावेळी ताब्यात घेतले आहे.
प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डन बी १ आणि बी २ या १३ मजल्याच्या दोन अनधिकृत इमारती बांधून १०० पेक्षा अधिक सदनिकाधारकांची फसवणूक केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. २००९ मध्ये आणि २०१२ मध्ये ठाणे महापालिकेने या इमारतींना वापर परवाना देऊन या इमारती अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सरनाईक यांच्या मागणीनुसार २०१३ मध्ये या इमारतींना नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यासाठी सरनाईक यांना टीडीआर आणि दंड म्हणून ३ कोटी ३३ लाख रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र १३ वर्ष उलटूनही सरनाईक यांनी यासंदर्भात काहीच केलेले नाही अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. २००९ ते २०२१ या कालावधीत ११ कोटी भरणे अपेक्षित असताना केवळ २५ लाख भरण्याचे सरनाईक यांनी विनंती केली असून दंडाची ही रक्कम पूर्ण भरावी तसेच सरनाईक यांच्यावर ठाणे महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ठाणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला आहे.
V r arrested by Thane Police, for Our "Thiyya Andolan" at Thane Municipal Corporation. V demand criminal action against Shivsena MLA Pratap Sarnaik & Recovery of ₹11 crore financial penalty from him for illegal construction of two 13 stories Buildings of Vihang Garden Thane pic.twitter.com/gpWXJ25M4t
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 2, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.