HW News Marathi
महाराष्ट्र

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज पुन्हा आपल्या मंत्रालयात कामकाजाला सुरुवात झाले आहे. मागील मंगळवारी १२ एप्रिल रोजी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयात 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी (१५ एप्रिल) धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर आज (१८ एप्रिल) सोमवारपासून धनंजय मुंडेंनी पुन्हा आपल्या कामकाजास सुरुवात केली.

धनंजय मुंडे दुपारी एकच्या सुमारास मुंडे मंत्रालयात आले. त्यांनी विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव दिनेश डिगळे, खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांच्यासमवेत विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली. मंत्रालयातील टपाल महत्त्वाच्या नस्ती यावर त्यांनी सह्या केल्या तसेच भेटावयास आलेल्या अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. आजारी असताना रुग्णालयातून देखील धनंजय मुंडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी सातत्याने ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे यासाठीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टरांना विनंती केली होती; मात्र संबंधित डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली नव्हती. दरम्यान आज श्री. मुंडे पुन्हा कामकाजावर रुजू झाल्याने विभागातीलअधिकारी कर्मचाऱ्यांसह मुंडेंच्या समर्थकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा? काँग्रेसचा सवाल

News Desk

‘साकीनाका बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार’, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

‘HSC’ निकालाचं काम करण्यास मुदतवाढ द्या, शिक्षक संघटनांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी!

News Desk